Jhadlya Bheri Jhadto Danka

Sudhir Phadke, G D Madgulkar, SUDHIR V PHADKE

झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
तोंड लागले आज लाह्याला
तोंड लागले आज लाह्याला
चहूबाजूनी येईल घाला
छातीवरती शस्त्रे झेला
फिरू नका रे डरू नका डरू नका डरू नका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका

शपथ तुम्हाला शिवरायाची
शपथ तुम्हाला शिवरायाची
मराठमोळ्या मर्दमकीची
समर्थ गुरु केसरी टिळकांची
विजयाच्या या ऐका हाका विजयाच्या या ऐका हाका
ऐका हाका ऐका हाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका

निशाण अपुले उंच धरा उंच धरा उंच धरा
निशाण अपुले उंच धरा उंच धरा उंच धरा
शूरपणाची शर्थ करा शर्थ करा शर्थ करा
कराच किंवा रणी मरा रणी मरा रणी मरा
कराच किंवा रणी मरा
बहाद्दरांनो मरणा जिंका मरणा जिंका मरणा जिंका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका
पुढचे पाऊल पुढेच टाका

Wissenswertes über das Lied Jhadlya Bheri Jhadto Danka von सुधीर फडके

Wer hat das Lied “Jhadlya Bheri Jhadto Danka” von सुधीर फडके komponiert?
Das Lied “Jhadlya Bheri Jhadto Danka” von सुधीर फडके wurde von Sudhir Phadke, G D Madgulkar, SUDHIR V PHADKE komponiert.

Beliebteste Lieder von सुधीर फडके

Andere Künstler von