Toch Chandrama Nabhant

Sudhir Phadke, Shanta Shelke

तोच चंद्रमा नभांत
तीच चैत्र यामिनी
तोच चंद्रमा नभांत तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी
तीच तूहि कामिनी
तोच चंद्रमा नभांत

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी
तीच तूहि कामिनी
तोच चंद्रमा नभांत

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे
मीहि तोच तीच तूहि प्रीति आज ती कुठे
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी
तीच तूहि कामिनी
तोच चंद्रमा नभांत

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सूरांतुनी
एकांती मज समीप तीच तूहि कामिनी
तीच तूहि कामिनी
तोच चंद्रमा नभांत

Wissenswertes über das Lied Toch Chandrama Nabhant von सुधीर फडके

Wer hat das Lied “Toch Chandrama Nabhant” von सुधीर फडके komponiert?
Das Lied “Toch Chandrama Nabhant” von सुधीर फडके wurde von Sudhir Phadke, Shanta Shelke komponiert.

Beliebteste Lieder von सुधीर फडके

Andere Künstler von