Ugi Ugi Re Ugi

Sudhir Phadke, G D Madgulkar

उगी उगी गे उगी
उगी उगी गे उगी
आभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी
चांदोबाची पहा बगी
उगी उगी गे उगी
उगी उगी गे उगी

ढगावरून ती चाले गाडी
शुभ्र पांढरी जरा वाकडी
ससा सावळा धावत ओढी
ससा सावळा धावत ओढी
असली अद्भुत गाडी कुठली रडणाऱ्यांच्या कुढ्या जगी
रडणाऱ्यांच्या कुढ्या जगी
उगी उगी गे उगी
उगी उगी गे उगी

चांदोबाच्या बघ माथ्यावर
निळसर काळी छत्री सुंदर
नक्षत्रांची तिजसी झालर
हसणाऱ्यांच्या घरी पिकवितो सर्व सुखाची चंद्रसुगी
सर्व सुखाची चंद्रसुगी
उगी उगी गे उगी
उगी उगी गे उगी

उगी पहा तो खिडकियात
चांदोबाचा आला हात
स्नात आईचा जणु दुधात
घे पापा तू त्या हाताचा भरेल इवले पोट लगी
भरेल इवले पोट लगी
उगी उगी गे उगी
उगी उगी गे उगी

Wissenswertes über das Lied Ugi Ugi Re Ugi von सुधीर फडके

Wer hat das Lied “Ugi Ugi Re Ugi” von सुधीर फडके komponiert?
Das Lied “Ugi Ugi Re Ugi” von सुधीर फडके wurde von Sudhir Phadke, G D Madgulkar komponiert.

Beliebteste Lieder von सुधीर फडके

Andere Künstler von