Visar Preet Visar Geet

Shantaram Nandgaonkar

विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
यापुढे न चांदरात
यापुढे न चांदरात यापुढे न सावली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली

कंठ दाटतो असा शब्दही मुळी न फुटे
कंठ दाटतो असा शब्दही मुळी न फुटे
काळजात एक एक तंतुही तसाच तुटे
मीच मांडिल्या
मीच मांडिल्या घरात शून्यता विसावली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली

शब्द तू दिलास एक राहिलो विसंबुनी
शब्द तू दिलास एक राहिलो विसंबुनी
वंचिलेस गे अखेर तूच शपथ मोडुनी
तू उगाच तू उगाच स्वप्न्वेल संशयात जाळिली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली

डोळियांत मी तुझ्या अखेर पाप जाहलो
डोळियांत मी तुझ्या अखेर पाप जाहलो
झेलण्या उरी कलंक एकटाच राहिलो
विश्व मोकळे तुला
विश्व मोकळे तुला मला चिताच लाभली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
यापुढे न चांदरात
यापुढे न चांदरात यापुढे न सावली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली
विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली

Wissenswertes über das Lied Visar Preet Visar Geet von सुधीर फडके

Wer hat das Lied “Visar Preet Visar Geet” von सुधीर फडके komponiert?
Das Lied “Visar Preet Visar Geet” von सुधीर फडके wurde von Shantaram Nandgaonkar komponiert.

Beliebteste Lieder von सुधीर फडके

Andere Künstler von