Shri Sainath Prabhatashtaka

प्रभातसमयीं नभा शुभ रवि प्रभा फांकली
स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली
म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता
परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा
तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी
कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे
त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें
अजातरिपु सदगुरु अखिलपातका भंजना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले
वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें
असा सुहितकारि या जगतिं कोणिही अन्य ना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा
न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा
जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा
समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा
घडो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना
प्रेमे या अष्टकासी
पहिली गुरुवारा राखीती जी प्रभाती
त्यांची चित्तासी देतो
अखिल हरुनीया भ्रांती मी नित्य शांती
ऐसे हे साईनाथे कथूनि सुचविले
जेविल्या बाळकासी
तेवी त्या कृष्णपायी
नमूनि स्तविलये अर्पितो अष्टकासी
श्री सद्गुरू सचिदानंद साईनाथ महाराज कि जय

Beliebteste Lieder von अजित कडकडे

Andere Künstler von