आभाळा (रवींद्र साठे)

आभाळा
आभाळा
आभाळा
आभाळा

आभाळा आभाळा आभाळा
आभाळा आभाळा आभाळा
कसदार बीजापोटी कसा तरारला इळा
कसदार बीजापोटी कसा तरारला इळा
बांडगुळा पाई झाडं काढतं का गळा
आभाळा आभाळा आभाळा

आ आ आ आ आ आ
कापुराच्या काजळीची का धग देवळा रं
कापुराच्या काजळीची का धग देवळा रं
उगवला कसा काय सूर्य ह्यो जांभळा रं
ईपरीत घडतंया काळ ह्यो आंधळा
मातीचा का न्हाय तुला थांग आभाळा
कसं फेडू धरणीचं पांग आभाळा रं
आभाळा आभाळा आभाळा

ढेकळात रुज हिथं हरेकाची नाळ रं नाळ रं
रगतात माती अंगी रग मायंदाळ मायंदाळ रं
एका बुक्कीत फोडली गाठीची बाभळ
कुस्तीमंदी लोळविला मल्ल महाबळ
फाळावानी हात तुझा काळावाणी घाव
फाळावानी हात तुझा काळावाणी घाव
आता कुठं ठाव
आता कुठं ठाव रं उष्टयासाठी धाव रं
आभाळा, आभाळा
आभाळा आभाळा आभाळा
आभाळा आभाळा आभाळा
आभाळा आभाळा आभाळा

Beliebteste Lieder von रविंद्र साठे

Andere Künstler von Film score