Arati Saprem Jai Jai Vithhal

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
भक्त संकटिं नाना
भक्त संकटिं नाना
स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म
स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी
हस्त तूझा लागतां
हस्त तूझा लागतां
शंखासुरा वर देसी
शंखासुरा वर देसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी
प्रल्हादाकारणें
प्रल्हादाकारणें
स्तंभीं नरहरि गुरगुरसी
स्तंभीं नरहरि गुरगुरसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळी नेसी
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी
वामनरूप धरुनी
वामनरूप धरुनी
बळिच्या द्वारीं तिष्ठसी
बळिच्या द्वारीं तिष्ठसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला
सहावा अवतार
सहावा अवतार
परशुराम प्रगटला
परशुराम प्रगटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

मातला रावण सर्वां उपद्रव केला
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला
पितृवचनालागीं रामें वनवास केला
मिळवुनी वानरसेना
मिळवुनी वानरसेना
राजा राम प्रगटला
राजा राम प्रगटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले
गोपिकांचें प्रेम
गोपिकांचें प्रेम
पाहुनी श्रीकृष्ण भुलले
पाहुनी श्रीकृष्ण भुलले
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा
सोडुन दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा
बहिरवि जान्हवी द्यावी
बहिरवि जान्हवी द्यावी
निजसुखानंदाची सेवा
निजसुखानंदाची सेवा
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
भक्त संकटिं नाना
भक्त संकटिं नाना
स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म
स्वरूपीं स्थापिसि स्वधर्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

Beliebteste Lieder von रविंद्र साठे

Andere Künstler von Film score