Mhatarya Sasaryachya Lagnacha

ANIL MOHILE, VIVEK APATE

म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
अरे म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
तर बैलाला फुटेल पाह्ना
तर बैलाला फुटेल पाह्ना आणी घालेल कोंबडा अंड

ए पोरी जरा तिथच थांब थांब थांब
जवळ नको येवू तुझे बाबा बगतात
बाबा बगतात बाबा बगतात डोळे वटारून बाबा बगतात
नेईन तुला मी लांब लांब लांब
आधी बाबांचे बग कसे १२ वाजतात
१२ वाजतात १२ वाजतात बाबांचे बग कसे १३ वाजतात

नवरीला घालून भिकेचा साज
बांधून बोहल्यावर ठेवलय आज
बांधून बोहल्यावर ठेवलय आज
मुलाकाचा हावरट पैशाची खाज
बाशिंग बांधतोय विकून लाज
बाशिंग बांधतोय विकून लाज

म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
अरे म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
तर फुटून मरेल मासा
तर फुटून मरेल मासा आणि घावेल कासव लंगड

ए पोरी जरा तिथच थांब थांब थांब
जवळ नको येवू तुझे बाबा बगतात
बाबा बगतात बाबा बगतात डोळे वटारून बाबा बगतात
नेईन तुला मी लांब लांब लांब
आधी बाबांचे बग कसे १२ वाजतात
१२ वाजतात १२ वाजतात बाबांचे बग कसे १३ वाजतात

सोडेना सावकार थेरड्याची पाठ
म्हणून घातलाय लग्नाचा घाट
म्हणून घातलाय लग्नाचा घाट
आता या चोराची टाकूया खाट
लग्नाची याच्या लावूया वाट
लग्नाची याच्या लावूया वाट

म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
ए म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
तर हत्तीचं मुंगीशी लफडं
तर हत्तीचं मुंगीशी लफडं ससा मोडेल सिंहाच तंगडं

ए पोरी जरा तिथच थांब थांब थांब
जवळ नको येवू तुझे बाबा बगतात
बाबा बगतात बाबा बगतात डोळे वटारून बाबा बगतात
नेईन तुला मी लांब लांब लांब
आधी बाबांचे बग कसे १२ वाजतात
१२ वाजतात १२ वाजतात बाबांचे बग कसे १३ वाजतात

म्हाताऱ्याचे या १२ चमचे वाकडे करू त्यांना कायमचे
व्हराडी जे या लग्नाचे दात ३२ पाडूया त्यांचे
म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
ए म्हाताऱ्या सासऱ्याच्या लग्नाचा जर जावई वाजवती बॅण्ड
तर होईल लुकडा गेंडा
तर होईल लुकडा गेंडा आणी उंदराचे पोलादी दंड

ए पोरी जरा तिथच थांब थांब थांब
जवळ नको येवू तुझे बाबा बगतात
बाबा बगतात बाबा बगतात डोळे वटारून बाबा बगतात
नेईन तुला मी लांब लांब लांब
आधी बाबांचे बग कसे १२ वाजतात
१२ वाजतात १२ वाजतात बाबांचे बग कसे १३ वाजतात

Wissenswertes über das Lied Mhatarya Sasaryachya Lagnacha von रविंद्र साठे

Wer hat das Lied “Mhatarya Sasaryachya Lagnacha” von रविंद्र साठे komponiert?
Das Lied “Mhatarya Sasaryachya Lagnacha” von रविंद्र साठे wurde von ANIL MOHILE, VIVEK APATE komponiert.

Beliebteste Lieder von रविंद्र साठे

Andere Künstler von Film score