Haravato Sukhancha
हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा
एकटा मी तुझ्या शोधतो का खुणा
हरवते हातूनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते, खेळ आहे जुना
साजणा तुझी याद
जाळी जीवाला या पुन्हा
मानत नाही, ये जिया
बैरी प्रीत मोहे छोडे ना
शोधतो रस्ता नवा, संपतो का असा
सांगण्याआधी कुणी, श्वास संपावा जसा
सरलेल्या क्षणांचे उडून जाती थवे
मी पुन्हा शोधते एकटेपण नवे
दुःख हे एवढा लावते का लळा
मीच का एकटा सांग ना रे मना
हरवते हातुनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते, खेळ आहे जुना
कोसळे आभाळ हे मन तसे वाहते
हे निखारे का असे सुलगती आतले
थकलेल्या जीवाला नीज येईल का
दुःख या अंतरीचे कोणी जाणेल का
नेमके हवेसे काय होते असे
एकटया क्षणांवर सोबतीचे ठसे
हरवते हातूनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते, खेळ आहे जुना
साजणा तुझी याद
जाळी जीवाला या पुन्हा
मानत नाही, ये जिया
बैरी प्रीत मोहे छोडे ना