तूझ्या पिरतीचा इंचु चावला [Original]

जीव झाला येडापीसा रात रात जागनं
पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं
जीव झाला येडापीसा रात रात जागनं
पुरं दिसभर तूझ्या फिरतो मागंमागनं
जादु मंतरली कुनी, सपनात जागंपनी
नशीबी भोग असा दावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
माग पळुन पळुन वाट माझी लागली
अन तू वळुन बी माहझ्याकडं पाह्यना...

भीरभीर मनाला या घालु कसा बांध ग
अवसची रात मी अन पुनवचा तु चांद ग
नजरतं मावतीया तरी दूर धावतीया
मनीचा ठाव तूला मीळना
हाता तोंडाम्होरं घास परी गीळना
गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना
सारी इस्कटून ज़िंदगी मी पाहिली
तरी झाली कुटं चूक मला कळना...

सांदी कोपरयात उभा येकला कधीचा
लाज ना कशाची तकरार न्हाई
भास वाटतोया ह्ये खरं का सपानं
सुखाच्या या सपनाला दार न्हाई
राखं झाली जगन्याची हाय तरी जीता
भोळं प्रेम माझं अन भाबडी कथा
बग जगतूय कसं, साऱ्या जन्माच हस
जीव चिमटीत असा घावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला
माग पळुन पळुन वाट माझी लागली
अन तू वळुन बी माहझ्याकडं पाह्यना...

Beliebteste Lieder von अजय गोगवले

Andere Künstler von Film score