Varyavarti Gandh [Original]

Ajay Gogavale, Atul Gogavale

वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गांव माझे
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गांव माझे
जल्लोष आहे आता उधाणलेला
स्वर धुंद झाला मनी छेडलेला
शहारलेल्या, उधाणलेल्या, कसे सावरावे
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गांव माझे

स्वप्नातले गांव माझ्या पुढे
दिवसाचा पक्षी अलगद उडे
फांदीच्या अंगावरती
चिमणी ती चिवचिवणारी
झाडात लपले सगे-सोयरे
हा गांव माझा जुना आठवाचा
नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा
ढगात उरले पाऊस-गाणे कसे साठवावे
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गांव माझे

हातातले हात मन बावरे
खडकाची माया कशी पाझरे
भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे झुंबर हलते
शब्दांना कळले हे गाणे नवे
ही वेळ आहे मला गोंदणारी
ही धुंद नाती गंधावणारी
पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे
वाऱ्यावरती गंध पसरला...
मातीमध्ये दरवळणारे

आय लाईक द कुल ब्रीझ
ब्लोईंग ओव्हर माय फेस
आय लाईक द कुल ब्रीझ
ब्लोईंग ओव्हर माय फेस

Beliebteste Lieder von कुणाल गांजावाला

Andere Künstler von Film score