Baghat Rahu De

Shantaram Athavale, Vasant Pawar

बघत राहु दे तुझ्याकडे
बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे भेट घडे
बघत राहु दे तुझ्याकडे

दुःख न उरले सरली भीती
अंगांगातून भरली प्रीती
दुःख न उरले सरली भीती
अंगांगातून भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे
धुंद गंध हा चहूकडे चहूकडे
बघत राहु दे तुझ्याकडे

गीत स्फुरे कंठातुन कोमल
गीत स्फुरे कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे
उल्लंघाया उंच कडे उंच कडे
बघत राहु दे तुझ्याकडे

सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे
हर्षसागरी गगन बुडे गगन बुडे
बघत राहु दे तुझ्याकडे
बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे भेट घडे
बघत राहु दे तुझ्याकडे
बघत राहु दे तुझ्याकडे

Wissenswertes über das Lied Baghat Rahu De von सुमन कल्याणपुर

Wer hat das Lied “Baghat Rahu De” von सुमन कल्याणपुर komponiert?
Das Lied “Baghat Rahu De” von सुमन कल्याणपुर wurde von Shantaram Athavale, Vasant Pawar komponiert.

Beliebteste Lieder von सुमन कल्याणपुर

Andere Künstler von Traditional music