Maj Sang Avastha Dootas Raghunathanchi

Sudhir Phadke, G D Madgulkar

माहापातीव्रता जानकीन संतापून सांगताच
रावणा सारखा पापात्मा हे क्षणभर घाबरल्या वाचून राहिला नाही
जनस्तानातील राम लक्ष्मणाचा अतुल पराक्रम त्येला ठाऊक होता
जानकीला वश होण्यासाठी आणखी एका महिनाचा अवधी देऊन
तो रावण अशोक बनातुन परतला
आता हनुमानास खात्री पटली हीच ती जानकी हीच ती सीता
अवती भोवती चार राक्षसी झोपले आहेत पाहून त्याने मंजुळ स्वरा मध्ये
रामचरित्राच गायन सुरू केल सीतेने चकित होऊन वरती पहिल
आणि हनुमानानि खाली झुकुन रामानि त्यांचा जवळ दिलेली मुद्रिका
तिचा हाता मध्ये टाकली सीतेनी ती मुद्रिका ओळखली
ह्रदयाशी धरली अणि हे पण ओळखल कि ज्या अर्थी ह्यांनी ही मुद्रिका आणली आहे
त्या अर्थी हा रामदूत असला पाहिजे ही निश्चिती पटल्यावर
ती त्या रामदूताला विचारु लागली
मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मुद्रिका अचुक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

हातांत धनू तें अक्षय भाता पृष्ठीं
विरहांत काय ते राघव झाले कष्टी
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं
कां श्यामल वलयें नयनतळीं चिंतांचीं
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

बसलेत काय ते लावुन कर कर्मातें
विसरलेत काय ते दुःखें निजधर्मातें
करितात अजून ना कर्तव्यें नृपतीचीं
करितात अजून ना कर्तव्यें नृपतीचीं
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

सोडिले नाहिं ना अजून तयांनीं धीरा
का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची
साह्यार्थ असति ना सैन्यें सन्मित्रांची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

इच्छिती विजय ना त्यांचा अवघे राजे
का लोकप्रीतिला मुकले प्रियकर माझे
विसरले थोरवी काय प्रभू यत्‍नांची
विसरले थोरवी काय प्रभू यत्‍नांची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

का मलाच विसरुन गेले माझे स्वामी
मी दैवगतीने पिचतां परक्या धामीं
का स्मृती तयांना छळिते या सीतेची
का स्मृती तयांना छळिते या सीतेची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

करतील स्वयें ना नाथ मुक्तता माझी
धाडील भरत ना सैन्य पदाति वाजी
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची
कळतसे त्यांस का वार्ता रघुनगरीची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं
का विपत्कालिं ये मोह तयांच्या चित्तीं
पुसटली नाहिं ना सीतेवरची प्रीती
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची
करतील मुक्तता कधिं ते वैदेहीची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

त्या स्वर्णघडीची हो‌इन का मी साक्षी
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं
त्या स्वर्णघडीची हो‌इन का मी साक्षी
कधिं रामबाण का घुसेल रावणवक्षीं
वळतील पाउलें कधी इथें नाथांचीं
वळतील पाउलें कधी इथें नाथांचीं
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जोंवरी तयांचें कुशल ऐकतें कानीं
तोंवरी सजिव मी असेन तैशा स्थानीं
जन्मांत कधी का होइल भेट तयांची
जन्मांत कधी का होइल भेट तयांची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची
मज सांग अवस्था दूता रघुनाथांची

Wissenswertes über das Lied Maj Sang Avastha Dootas Raghunathanchi von सुधीर फडके

Wer hat das Lied “Maj Sang Avastha Dootas Raghunathanchi” von सुधीर फडके komponiert?
Das Lied “Maj Sang Avastha Dootas Raghunathanchi” von सुधीर फडके wurde von Sudhir Phadke, G D Madgulkar komponiert.

Beliebteste Lieder von सुधीर फडके

Andere Künstler von