Divas Olya Pakalyanche

Guru Thakur

दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले
हो दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले
स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले

दिवस वेडे स्वप्नपंखी रेशमाची झूल झाले
दिवस वेडे स्वप्नपंखी रेशमाची झूल झाले
ओंजळीने मागण्याआधीच सरले मेघ सारे
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले

दिवस थोडे स्पर्श वेडे दोन आतुरल्या जीवांचे
हो, दिवस थोडे स्पर्श वेडे दोन आतुरल्या जीवांचे
हरवलेले भान केवळ श्वास होते बोललेले
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले

दिवस मोहरल्या मनाचे
सुख नवे घेऊन आले
दिवस मोहरल्या मनाचे
सुख नवे घेऊन आले
चांद थोडा लाजला अन्
चांदणे टिपूर झाले
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले
हो, स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
दिवस ओल्या पाकळ्यांचे
जाणिवांना गंध ओले

Wissenswertes über das Lied Divas Olya Pakalyanche von स्वप्निल बांदोडकर

Wer hat das Lied “Divas Olya Pakalyanche” von स्वप्निल बांदोडकर komponiert?
Das Lied “Divas Olya Pakalyanche” von स्वप्निल बांदोडकर wurde von Guru Thakur komponiert.

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music