Chaal Majhya Paayat Ghumle Ga

BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR

चाळ माझ्या पायात पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावाणी
चाळ माझ्या पायात पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावाणी
काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात
काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात
गोड गोड गुपित तुझ्या मनी रे
चाळ माझ्या पायात पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावाणी
डौल आला खांद्याला बाक आला बांध्याला
डौल आला खांद्याला बाक आला बांध्याला
हातांची झाली अशी नागफणी
रुसते मी मनात हसते गालात
रुसते मी मनात हसते गालात
झुलते मी सुरांत रातराणी रे
चाळ माझ्या पायात पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावाणी
नाजूक ओठाखाली
नाजूक ओठाखाली
छोटीशी बाई करंगुली
नाजूक ओठाखाली
छोटीशी बाई करंगुली
लाजते मी मनात कशि सांगु जनात
लाजते मी मनात कशि सांगु जनात
नांदू दोघं जशी राजा राणी रे
चाळ माझ्या पायात पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावाणी
रूप माझं चंद्राचं पहा लाख मोलाचं
रूप माझं चंद्राचं पहा लाख मोलाचं
चंद्राची कोर मी तारांगणी
लुकलुकत्या ताऱ्यात डुलते तोऱ्यात
लुकलुकत्या ताऱ्यात डुलते तोऱ्यात
शोभते शुक्राची मी चांदणी रे
चाळ माझ्या पायात पाय माझे तालात
नाचते मी तोऱ्यात मोरावाणी

Wissenswertes über das Lied Chaal Majhya Paayat Ghumle Ga von Asha Bhosle

Wer hat das Lied “Chaal Majhya Paayat Ghumle Ga” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Chaal Majhya Paayat Ghumle Ga” von Asha Bhosle wurde von BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock