Dev Disala Mala
सूर्यरथावर बसुनी आला नारायण माझा
दळींदराच्या घरी अवतरे लोकांचा राजा
देव दिसला ग मला देव दिसला
देव दिसला ग मला देव दिसला
साधूसंतांच्या रुपाने मनीं ठसला
साधूसंतांच्या रुपाने मनीं ठसला
देव दिसला ग मला देव दिसला
देव दिसला ग मला देव दिसला
सणासुदीचे दान म्हणू की दसरा आज दिवाळी
भाग्य जणू हे चालुन आले
भाग्य जणू हे चालुन आले हळव्या सोनसकाळी
मुला-फुलांच्या डोळ्यांमधुन हसला
मुला-फुलांच्या डोळ्यांमधुन हसला
देव दिसला ग मला देव दिसला
देव दिसला ग मला देव दिसला
अनेक देही एकच आत्मा नित्य करी वास
अंगणात या बसुनी खाऊ
अंगणात या बसुनी खाऊ प्रेमाचा हा घास
सारे समान हो भेदभाव कसला
सारे समान हो भेदभाव कसला
देव दिसला ग मला देव दिसला
देव दिसला ग मला देव दिसला
देव दिसला ग मला देव दिसला
अनंत पापे धुवून जाती असली ही पुण्याई
प्रेमरूप हे क्रोधा आले
प्रेमरूप हे क्रोधा आले विष हे अमृत होई
बलिदानाने कलंक हा पुसला
बलिदानाने कलंक हा पुसला
देव दिसला ग मला देव दिसला
देव दिसला ग मला देव दिसला
साधूसंतांच्या रुपाने मनीं ठसला
साधूसंतांच्या रुपाने मनीं ठसला
देव दिसला ग मला देव दिसला
देव दिसला ग मला देव दिसला