Dnyandev Bala Maza

Vasant Prabhu, P Savalaram

ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता
ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता
ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनवीते मराठी मी त्याची माता
ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता

गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बालपणा
गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बालपणा
बांधुनीया घुंगुरवाळे अंगी नाचे थोरपणा
निरूपण सांगायाला
निरूपण सांगायाला तुम्ही द्या हो शहाणपणा
बाळमुखी मोठा घास भरवा हो जगन्नाथा
ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता

निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल
निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल
अमृताते जिंकित पैजा धावे मराठाची बोल
ज्ञानदीप डोळियांचे
ज्ञानदीप डोळियांचे तेजाळता तेजोगोल
देवगुरु खाली आले जोडुनिया दोन्ही हाता
ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनवीते मराठी मी त्याची माता
ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता

Wissenswertes über das Lied Dnyandev Bala Maza von Asha Bhosle

Wer hat das Lied “Dnyandev Bala Maza” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Dnyandev Bala Maza” von Asha Bhosle wurde von Vasant Prabhu, P Savalaram komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock