He Jeevan Sundar Aahe

ANAND MODAK, SUDHIR MOGHE

आह हां हा आह
आह हां हा आह
आह हां हं हं हं आह हां हा

हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे

नितळ निळाई आकाशाची अन्‌ क्षितिजाची लाली
दंवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी
नितळ निळाई आकाशाची अन्‌ क्षितिजाची लाली
दंवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी

अहो आता विसरा हे सगळं इथं इमारतींच्या जंगलातला वनवास
त्यातून दिसणारं टीचभर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

कोठेही जा अवतीभवतीं निसर्ग एकच आहे
हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे

पानांमधली सळसळ हिरवी अन्‌ किलबील पक्षांची
झुळझुळ पाणी वेळुमधुनी खुळी शीळ वार्‍याची
पानांमधली सळसळ हिरवी अन्‌ किलबील पक्षांची
झुळझुळ पाणी वेळुमधुनी खुळी शीळ वार्‍याची

हं हं इथं गाणं लोकलचं पाणी तुंबलेल्या नळाचं
आणि वारं डोक्यावर गरगरणार्‍या पंख्यांचं

इथेतिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे
हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे

पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा
टपटप पागोळ्यांतून अपुल्या ओंजळीत येणारा
पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा
टपटप पागोळ्यांतून अपुल्या ओंजळीत येणारा

पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं कपड्यांचा सत्यनाश आणि सर्दीला निमंत्रण

जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे
जगण्यावरचे प्रेम जणु हे धुंद बरसते आहे

हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे ए ए ए
हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे

लाला लल लाला
लाला लल लाला
हं हं हं हं हं हं

Wissenswertes über das Lied He Jeevan Sundar Aahe von Asha Bhosle

Wer hat das Lied “He Jeevan Sundar Aahe” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “He Jeevan Sundar Aahe” von Asha Bhosle wurde von ANAND MODAK, SUDHIR MOGHE komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock