Ja Ja Ja Re Nako Bolu Ja Na
जा जा जा रे नको बोलु जा ना
जा जा मीही भिते काय कोणा
जा जा जा रे नको बोलु जा ना
जा जा मीही भिते काय कोणा
आधी स्वत: केला गुन्हा
जोरा तुझा का रे पुन्हा सांग ना
जा जा जा रे नको बोलु जा ना
माझे मन वारा
भवती फिरणारा
झुरतो झुरणारा क्षणाक्षणां
माझे मन वारा
भवती फिरणारा
झुरतो झुरणारा क्षणाक्षणां
स्वैर मी वाहते मुक्त मी चेतना
जा जा जा रे नको बोलु जा ना
जा जा मीही भिते काय कोणा
मी रे फुललेली
वासंतिक वेली
सुमनें भुलवावे कुणा कुणा
मी रे फुललेली
वासंतिक वेली
सुमनें भुलवावे कुणा कुणा
गंध का कोणत्या मानितो बंधना
जा जा जा रे नको बोलु जा ना
जा जा मीही भिते काय कोणा
जा जा जा रे नको बोलु जा ना