Khulya Khulya Re
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला
कसा वाहे गार वारा अंग सारे थर्थरे
कसा वाहे गार वारा अंग सारे थर्थरे
त्यात तुझा अनावर वरतुनी रे हात फिरे
त्यात तुझा अनावर वरतुनी रे हात फिरे
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला
कुठे जाऊ धाऊ कुठे अता पुरती भिजले
कुठे जाऊ धाऊ कुठे अता पुरती भिजले
धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले
धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला
खुळ्या खुळ्या रे पावसा किती भिजविसी मला