Kunala Sangu Mazi Vyatha

Shantaram Athavale, Jog Prabhakar

कुणाला सांगू माझी व्यथा हा हा हा हा
कुणाला सांगू माझी व्यथा
कुणाला सांगू माझी व्यथा
प्राजक्ताच्या प्रासादावर पडली विद्युल्लता
कुणाला सांगू माझी व्यथा
कुणाला सांगू माझी व्यथा

प्रलयाचे हे भीषण तांडव डळमळला गगनाचा मांडव
थरथरत्या पृथ्वीवर नाचे तिमिरदैत्य एकटा
कुणाला सांगू माझी व्यथा
कुणाला सांगू माझी व्यथा

कशास घडल्या अपुल्या भेटी
कशास जडली वेडी प्रीती
कशास घडल्या अपुल्या भेटी
कशास जडली वेडी प्रीती
मीलन अपुले ठरली आता स्वप्नामधील कथा
कुणाला सांगू माझी व्यथा
कुणाला सांगू माझी व्यथा

कोण निवारील घोर अनर्था तूच प्राण तू जीवन पार्था
कोण निवारील घोर अनर्था तूच प्राण तू जीवन पार्था
ये विझवाया हा दावानल शिंपाया अमृता
कुणाला सांगू माझी व्यथा
कुणाला सांगू माझी व्यथा

Wissenswertes über das Lied Kunala Sangu Mazi Vyatha von Asha Bhosle

Wer hat das Lied “Kunala Sangu Mazi Vyatha” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Kunala Sangu Mazi Vyatha” von Asha Bhosle wurde von Shantaram Athavale, Jog Prabhakar komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock