Kutha Kutha Jayacha Honeymoonla

BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR

अहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरल असका
हेरल ते हेरल अन्‌ लगीन अपुल ठरल आता चांगल झालंकी
लगीन झाल गोंधळ झाला
आता एक काम हो उरल आता आणि काय उरल

लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाच हनिमूनला सांगा
कुठं कुठं जायाच हनिमूनला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
आता कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
हो कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला

रातभर एकली जागू कशी
सासूला अडचण सांगू कशी
रातभर एकली जागू कशी
सासूला अडचण सांगू कशी
घरात पाव्हणं न्‌ दारात मेव्हणं
एकांत मिलेना भटायला
कुठं कुठं जायाच हनिमूनला आता
कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
आता बोला कि हो हनिमूनला

नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाच हनिमूनला आता
कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
हो हो कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला

गुलाबी थंडीत गमतीन
मजेत राहू या संगतीन
गुलाबी थंडीत गमतीन
मजेत राहू या संगतीन
जातानदोघं न्‌ येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बैंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
आता तरी बोला कि हो हनिमूनला
कुठं कुठं जायाच हनिमूनला
राया कुठं कुठं जायाच हनिमूनला

Wissenswertes über das Lied Kutha Kutha Jayacha Honeymoonla von Asha Bhosle

Wer hat das Lied “Kutha Kutha Jayacha Honeymoonla” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Kutha Kutha Jayacha Honeymoonla” von Asha Bhosle wurde von BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock