Man Vadhal Vadhal

Bahinabai Chaudhary, Vasant Pawar

मन वढाळं वढाळं उभ्या पिकातलं ढोरं
मन वढाळं वढाळं उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला फिरुन येतं पिकांवर
किती हाकला हाकला फिरुन येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्‍यानं चालल्या पान्यावरल्या रे लाटा
जशा वार्‍यानं चालल्या पान्यावरल्या रे लाटा

मन पाखरु पाखरु याची काय सांगू मात
आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळातं
आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळातं

मन जहरी जहरी, याचं न्यारं रे तंतर याचं न्यारं रे तंतर
अरे विंचू साप बरा त्याला उतारे मंतर
अरे विंचू साप बरा त्याला उतारे मंतर

मन एवढं एवढं जसा खसखसचा दाणा
मन केवढं केवढं त्यात आभाळ माईना
मन केवढं केवढं त्यात आभाळ माईना

असं कसं मन देवा असं कसं रे घडलं
असं कसं मन देवा असं कसं रे घडलं
कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं
कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं
कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं

Wissenswertes über das Lied Man Vadhal Vadhal von Asha Bhosle

Wer hat das Lied “Man Vadhal Vadhal” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Man Vadhal Vadhal” von Asha Bhosle wurde von Bahinabai Chaudhary, Vasant Pawar komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock