Mee Aaie Hovuni Chukle Ka
आई होऊन चुकले का चुकले का मी
आई होऊन चुकले का मी
आई होऊन चुकले का
पोर पोटची देत न ओळख
पोर पोटची देत न ओळख
आईपणाला मुकले का मी
आई होऊन चुकले का
नऊ मासाचा, पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला
हो नऊ मासाचा, पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला
पदराआडून अमृत पान्हा पदराआडून अमृत पान्हा
या मायेने जिला पाजिला
तळहाताच्या फोडापरी हो या लेकीला जपले का मी
आई होऊन चुकले का
पती विरहाचे दु:ख विसरूनि शोधित आले तुजला पोरी
'आई' म्हण तू या आईला' आई' म्हण तू या आईला
सांगायाची झाली चोरी
अभागिनीचे सुख हे इवले तुलाही देवा खुपले का मी
आई होऊन चुकले का मी आई होऊन चुकले का