Potasathi Nachate Mee

Jagdish Khebudkar, Viswanath More

लाज धरा पाव्हणं जरा जनाची मनाची
जनाची मनाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
लाज धरा पाव्हणं जरा जनाची मनाची
लाज धरा पाव्हणं जरा जनाची मनाची जनाची मनाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
अहो ध्यान धरा जरा हिची कदर करा
हीचं काळीज समजून घ्या
हीचं काळीज समजून घ्या
ओ ओ पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची

डावा डोळा मिटूनी खुणवू नका हो
डावा डोळा मिटूनी खुणवू नका हो
फिदीफिदी हसूनी हिणवू नका हो
हिणवू नका हो
आठवण जपली मी
आठवण जपली मी तरणेपनाची तरणेपनाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
अहो ध्यान धरा जरा हिची कदर करा
हीचं काळीज समजून घ्या
हीचं काळीज समजून घ्या
आ आ पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची

अंगावर घेतला अंकुराचा साज अंकुराचा साज
अंगावर घेतला अंकुराचा साज अंकुराचा साज
सुख्खा संग दुःखाचं घेतलं मी ओझं
सुख्खा संग दुःखाचं घेतलं मी ओझं
ऊरामध्ये निशाणी ही
ऊरामध्ये निशाणी ही सख्या सजनाची सख्या सजनाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
अहो ध्यान धरा जरा हिची कदर करा
हीचं काळीज समजून घ्या
हीचं काळीज समजून घ्या
आ आ पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची

हरपलं भान हो एडीपिशी झाले
हरपलं भान हो एडीपिशी झाले
नाच नाचूनी मी घामामधी न्हाले घामामधी न्हाले
माती झाली बाई माझ्या आ आ
माती झाली बाई माझ्या रुपाची गुणाची रुपाची गुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
लाज धरा पाव्हणं जरा जनाची मनाची
लाज धरा पाव्हणं जरा जनाची मनाची जनाची मनाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची

Wissenswertes über das Lied Potasathi Nachate Mee von Asha Bhosle

Wer hat das Lied “Potasathi Nachate Mee” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Potasathi Nachate Mee” von Asha Bhosle wurde von Jagdish Khebudkar, Viswanath More komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock