Priti Priti Saare

Davjekar Datta, G D Madgulkar

प्रीती प्रीती
प्रीती प्रीती सारे म्हणती,
प्रीति म्हणजे काय ? काय
प्रीति म्हणजे काय ? काय
प्रीति म्हणजे काय ? काय

दिवस विलक्षण, सुंदर तो क्षण
चाफ्याखाली तुला पाहिली
चाफ्याखाली तुला पाहिली
केस रेशमी, नयन बदामी
हसलीस का तू ?
हसलो का मी ? (का हसलास)
मनात आले (काय आलं )
मनात आले काहीबाही
आणि थबकले पाय आ आ आ आ हा हा हा हा

पायी हिरवळ गगनी तारा
युवक समोरी हसरा गोरा
शीळ पुकारित गेला वारा
गोड शिर्शिरी उभ्या शरीरी
गोड शिर्शिरी उभ्या शरीरी
तनामनातुन लहर एक ती
वीज चेतवित जाय आ आ आ आ हा हा हा हा

नकळत नकळत जवळी सरलो
तरुवेलीसम का मोहरलो
लाजलाजे उगा राहिलो
हात मी तुझा हाती प्रिये घेतला
हृदयी का या ठेऊन दिधला
कलकल कलकल करी अचानक
पक्ष्यांचा समुदाय आ आ आ आ हा हा हा हा

Wissenswertes über das Lied Priti Priti Saare von Asha Bhosle

Wer hat das Lied “Priti Priti Saare” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Priti Priti Saare” von Asha Bhosle wurde von Davjekar Datta, G D Madgulkar komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock