Sharad Sundar Chanderi Rati

Hemant Bhosle, Shanta Shelke

शारद सुंदर चंदेरी राती
ला ला ला ला ला ला ला ला

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे मोहना रे ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी सगेसोयरे मी सांडिले पाठी
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी सगेसोयरे मी सांडिले पाठी
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला

मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतिची हीच न रीती
कशाला कुणाची भीती
झाडामागे चांद हा वरती आला
ये ना ये ना
आतुर जीव हा झाला
मी भूलावे स्वैर व्हावे गीत गावे
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला

वाऱ्यात लहर मंद
फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद
जिवाला करिती धुंद
माझ्या देही पुनवचांदणे साजे
प्राणांमध्ये प्रीतिची पावरी वाजे
आज राया धुंद काया मोहवाया
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे मोहना रे ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगेसोयरे मी सांडिले पाठी
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
ला ला ला ला ला हा ला ला
ला ला ला ला ला हा ला ला

Wissenswertes über das Lied Sharad Sundar Chanderi Rati von Asha Bhosle

Wer hat das Lied “Sharad Sundar Chanderi Rati” von Asha Bhosle komponiert?
Das Lied “Sharad Sundar Chanderi Rati” von Asha Bhosle wurde von Hemant Bhosle, Shanta Shelke komponiert.

Beliebteste Lieder von Asha Bhosle

Andere Künstler von Pop rock