Yugayuganche Naate Apule
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
सहवासाची ओढ निरंतर
सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
भासे सारे सुने तुझ्याविण
तुझ्याचसाठी आसुसले मन
तोडून बेड्या सर्व जगाच्या
कधी आपुले होईल मिलन
उनसावल्या उनसावल्या झेलत हासत जन्म सरावा
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
जो तो आहे ज्याचा त्याचा
परके झाले सारे जीवलग
देह दोन परि एकच आत्मा
कुणा कळावी अपुली तगमग
एकच आशा
एकच आशा शेवटचा दिस गोड करावा
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
सहवासाची ओढ निरंतर
सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा