Ladalya
आ आ आ आ
हरलो तुटलो थकलो आता
खचलो दुखलो चुकलो आता
कळ लागे रे काळजाला या
हाक देतो साद दे ना
कुठे आहे तू सांग ना
लाडल्या रे लाडल्या
माझ्या बाळा तू लाडल्या
आहे कुठे माझ्या लेकरा
माझ्या बाळा तू लाडल्या
आई तुझी आहे दुखी
घेऊन ध्यास रे
अन्न मुखी ना पाणी मुखी
घेते बस श्वास रे
डोळेभरून पदर गरजेला लोटला
ओ लाडल्या रे लाडल्या
माझ्या बाळा तू लाडल्या
आहे कुठे माझ्या लेकरा
माझ्या बाळा तू लाडल्या
नजरेस दिसतो तुझा चेहरा
होतो रे भास मला
खेळ तुझा तो डाव तुझा
दिसतो दिन रात मला
येऊन बिलगून माझे आता
एकदा बोल बाबा मला
लाडल्या रे लाडल्या
माझ्या बाळा तू लाडल्या
आहे कुठे माझ्या लेकरा
माझ्या बाळा तू लाडल्या