Title Song

अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला
दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जिवाला
अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला
दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जिवाला
स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी बंध रेशीम भासे
ही अशी
एकुलती एक
एकुलती एक

बोलकी बोलकी अन् कधी शांत ही
चांद रातीतला रम्या एकांत ही
बोलकी बोलकी अन् कधी शांत ही
चांद रातीतला रम्या एकांत ही
हळूच हासे ही स्वप्न भासे ही पालवी लाजरी
ही अशी
एकुलती एक
ही अशी
एकुलती एक

पावलो पावली बस तिची सावली
नीतीच्या अंतरी तिच माझ्यातही
पावलो पावली बस तिची सावली
नीतीच्या अंतरी तिच माझ्यातही
राग फसवा हा गोड रुसवा थोडीशी बावरी
ही अशी
एकुलती एक
ही अशी
एकुलती एक
अंतरंगात रंग उधळून दंग करते मनाला
दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावी जिवाला
स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी बंध रेशीम भासे
ही अशी
एकुलती एक
एकुलती एक

Beliebteste Lieder von Sonu Nigam

Andere Künstler von Pop