Aabhalachya Gavala
आभाळाच्या गावाला खेळू चला लागोर्या
चांदोबाचा चेंडू घ्या डोंगराच्या भिंगोऱ्या
बर्फाचे धुके हिमशिखरावर उभे
हिमगौरीचे जागे हे इथे कोणी टांगले
उंच माथ्यावर आहे
ढगोबाचे घर त्याला नाही रे छप्पर
असे कोणी बांधले रे वा रे वा रे वा
या आकाशाच्या पतंगाला मांजा बांधूया रे वा
या डोंगराच्या डोक्यावर चांदोबाचा टप्पा मारूया रे वा

या डोंगराच्या डोक्यावर चांदोबाचा टप्पा मारूया
आले हे कुठून ऊन पाणी माती
कुणी जोडली हि माणसांची नाती
स्वप्नाचे थवे त्याला रंग हि नवे
मला सारेच हवे हे चित्र कुणी काढले
द्या पटकन उत्तर हा तपकिरी पत्थर
याला वाऱ्याचे अत्तर इथे कुणी लावले रे वा रे वा रे वा
या आकाशाच्या पतंगाला मांजा बांधूया रे वा
या डोंगराच्या डोक्यावर चांदोबाचा टप्पा मारूया रे वा
या आकाशाच्या पतंगाला मांजा बांधूया रे वा
या डोंगराच्या डोक्यावर चांदोबाचा टप्पा मारूया
युगामागुनी हि चालली युगे
हे क्षण ती जुनी थांबलेले
आनंदाची नाव तिचे पैलतीरी गाव
त्याचे लागे नारे ठाव हे कोडे कुणी घातले
नाही थाऱ्यावर मान गेले वाऱ्यावर
जस पाऱ्यावर थेम्ब डावाचा पदे रे वा रे वा