Datala Andhar

दाटला अंधार काळोखी जीव पेटला
दाटला अंधार काळोखी जीव पेटला
याच साठी का मी जन्म घेतला
दाटला अंधार काळोखी जीव पेटला

तीक्ष्ण का त्या यातनांनी रक्त झाला देह हा
आसमंत शांत झाला धुंद वारा मंद का
तीक्ष्ण का त्या यातनांनी रक्त झाला देह हा
आसमंत शांत झाला धुंद वारा मंद का
स्वप्न हे मरणेचं आता
स्वप्न हे मरणेचं आता साधना या वेदना
दाटला अंधार काळोखी जीव पेटला
दाटला अंधार काळोखी जीव पेटला

भ्रष्ट या नजरांमधुनी सोवळा जो स्पर्श झाला
मुक्त या जगण्यास आता आसवांचा बांध झाला
संपवा हे चक्र आता
संपवा हे चक्र आता संपवा या धारणा
दाटला अंधार काळोखी जीव पेटला
दाटला अंधार काळोखी जीव पेटला

Beliebteste Lieder von बेला शेंडे

Andere Künstler von Film score