Visaruni Kshana
Anuradha Rajadhyaksha
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
सांडले सुख किती
वेचुनी तू आन ना
धावले सारखे
शोधण्या मी मला
तुजविना हरवला
अर्थ श्वासातला
ये पुन्हा सावराया मला
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
उत्तरे जेव्हा मिळाली
प्रश्न होते वेगळे
प्रश्न बनुनी उत्तरांनी
वैर का हे साधले
दिवस झाले वजा
एकमेकाविना
वळून पाहू जरा
साथ देशील ना
ये पुन्हा सावराया मना
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना
कुशीत तुझिया हळूच यावे
निजवावे शांत तू
अंतरीच्या स्पंदनांचे
गीत आपण गुणगुणू
जपून मी ठेवला आठवांचा ठसा
निसटला काळजा परत आनावता
ये पुन्हा सावराया मना
विसरुनी क्षण जुने
तू नव्याने भेट ना