Wajle Ki Bara [Original]

Ajay Gogavale, Atul Gogavale, Guru Thakur

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा
जीव झाला येडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटू कवातरी साजणा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
हे कशा पाई छळता
मागं मागं फिरता
असं काय करता दाजी
हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली
नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा... जी जी रे जी

ऐन्यावानी रुप माझं उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात
नादावलं खुळंपीसं कबुतर हे माज्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
उगा घाई कशापायी हाये नजर उभ्या गावाची
नारी गं रानी गं हाये नजर उभ्या गावाची
शेत आलं राखणीला राघु झालं गोळा
शीळ घाली आडुन कोनी करून तिरपा डोळा
आता कसं किती झाकू, सांग कुटंवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
हे कशा पाई छळता
मागं मगं फिरता
असं काय करता दाजी
हिला भेटा की येत्या बाजारी
हे सहाची बि गाडी गेली
नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा... जी जी रे जी

हो, आला पाड झाला भार
भरली उभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी
टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारं झोबणारं
द्वाड पदर जागी ठरना
आडोश्याच्या खोडीचं मी
कसं गुपित राखू कळंना
नारी गं रानी गं कसं गुपित राखू कळंना
हे, मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलिया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताची ही तुझी ऱ्हाऊ द्या
मला जाऊ द्या ना
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
अहो जाऊ द्या ना घरी
कशा पाई छळता
मागं मगं फिरता
असं काय करता दाजी
हिला भेटा की येत्या बाजारी
सहाची बि गाडी गेली
नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा... जी जी रे जी

Beliebteste Lieder von बेला शेंडे

Andere Künstler von Film score