Premala

Satyajeet Ranade

प्रेमाला ओढ आज त्या कुणाची
रातराणी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी
प्रेमाला ओढ आज त्या कुणाची
रातराणी च्या फुलाची धुंद आज प्रीत मोहरावी
मनीच्या दिशा मोकळ्या अशा
छेड़ते कश्या ताल ही नवी
तुझे प्रेम रे माझ्या मना देई जणू नवी पालवी
प्रेमाला ओढ आज त्या कुणाची
रातराणी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी

अरे ऐक ना तुला सांगते
काज आज मिलनाची मनी वाजते,
वाहते हवा आणि चंदवा भरते मनात आशा असे वाटते
असा हा शहरा मला आज दे ना
मीठी ही तुझी रे दे पुन्हा एकदा
स्पर्श रंग हे लेउनि असे प्रेम चित्र हे कोण रंगवी
गोड गोजिरे चित्र पाहण्या साथ रे मला तुझी ही हवी
प्रेमाला ओढ आज त्या कुणाची
रातराणी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी

अरे ऐक ना मी ही ऐकते
एक ताल पावसाळी झंकारते
साज हे मनी थेंब छेडते होऊनि नदी पुन्हा ही प्रीत वाहते
अवेळी ढगाला जशी जाग आली
तसा तू समोरी ये पुन्हा एकदा
शोधते तुला प्रितिच्या वनी
वाट रे तुझी मेघ दाखवी
सोबती सरे सांजवेळ ही
वाटते मला ही हवी हवी
प्रेमाला ओढ आज त्या कुणाची
रातराणी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी
ता रा रा रा रा रा ता रा रा रा रा रा हम्म हम्म हम्म

Beliebteste Lieder von प्रियांका बर्वे

Andere Künstler von Film score