Waata Waata

वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं

आ हा आ हा हा हा हा
रानफुलांहून फुलने माझे हट्टी गं
सहा ऋतुंशी जन्माने मी कट्टी गं
मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे
मैत्रीण माझी मी मलाअप्रूप माझे
आनंदी मी आनंदाची युक्ती गं
दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं
दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं
लख लख मोती माझ्या आत
कसा मी वेचू आता गं
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
माथी छाया पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं

Beliebteste Lieder von प्रियांका बर्वे

Andere Künstler von Film score