Dhundi Havechi
Prajwal Yadav, Vivekanand Sanap, 7 Series Records Marathi
धुंदी हवेची
छळवी नशा ही
शोधे किनारा ...शोधे किनारा....
मस्ती धुक्याची
अडवे दिशा ही
देई सहारा.....देई सहारा
सर जशी पावसातली
बोलते मौनातूनी
भेटशी थेंबातूनी
तसा तु भासतो मला
हलके हलके..बरसून यावे
दाटुन जावे नभातूनी
तु थेंब व्हावे..मौन तुटावे...
तु झंकरावे पानांतुनी..
बोले विना उमगे खेळ फितूर सारे
हे गुंफणे की हे भाव मनाचे
घेरून बसती...सारे शहारे
मोहरला गंध हा असा
बिलगला रंग तु जसा
बरसता मेघ सावळा
तसा तु भासतो मला
तसा तु भासतो मला....
सर जशी पावसातली
बोलते मौनातूनी
भेटशी थेंबातूनी
तसा तु भासतो मला