Are Sansar Sansar
Bahinabai Chaudhary, Vasant Pawar
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
अरे संसार संसार
खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाला
लोटा कधी म्हणू नये
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
अरे संसार संसार
नाही रडणं कुढणं
अरे संसार संसार
नाही रडणं कुढणं
येडया गळयातला हार
म्हणू नको रे लोढणं
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
अरे संसार संसार
दोन जीवांचा विचार
अरे संसार संसार
दोन जीवांचा विचार
देत सुखाला नकार
आणि दुखाःला होकार
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
अरे संसार संसार