Hi Vaat Kuni Mantarli
ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे
ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे
त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे
ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे
त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे
ही वाट कुणी मंतरली
पाकळी पाकळी जपली पर्णामागे ती लपली
ती मूक व्यथा बकुळीची रे आज पुन्हा दरवळली
पाकळी पाकळी जपली पर्णामागे ती लपली
ती मूक व्यथा बकुळीची रे आज पुन्हा दरवळली
गंधांचे घेउनी गुज
गंधांचे घेउनी गुज का अगतिक झाले वारे
त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे
ही वाट कुणी मंतरली
का पंख नवे घेउनिया क्षण आज पुन्हा पालवले
का पंख नवे घेउनिया क्षण आज पुन्हा पालवले
घरट्याच्या व्याकुळ अधरी ते गीत पुन्हा अंकुरले
मनवासी ते वेल्हाळ
मनवासी ते वेल्हाळ पाखरू परतले का रे
त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे
ही वाट कुणी मंतरली
जे बोलु नये शब्दांनी जे दावू नये डोळ्यांनी
ही सांज उजळली मितवा त्या रूप आनंदांनी
जे बोलु नये शब्दांनी जे दावू नये डोळ्यांनी
ही सांज उजळली मितवा त्या रूप आनंदांनी
लाटेवर वाहुन नेऊ
लाटेवर वाहुन नेऊ क्षितिजाचे सर्व किनारे
त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे
ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे
त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे
ही वाट कुणी मंतरली