Kuthala Madhu Zankar
Shukla, Yeshwant Deo
कुठला मधु झंकार कुठला मधु झंकार
तुटता आश्या अशी अचानक
तुटता आश्या अशी अचानक
ही वीणेची तार
कुठला मधु झंकार आ कुठला मधु झंकार
गाऊ कशी मी नवे तराणे
राग विसरले जुने पुराणे
गाऊ कशी मी नवे तराणे
राग विसरले जुने पुराणे
केविलवाणे अबोल गाणे
केविलवाणे अबोल गाणे
आज जीवाभावाची माझी बनली मुकी सतार
कुठला मधु झंकार आ कुठला मधु झंकार
भग्न मनोरथ उधळीत सारे
आकांक्षांचे हिरेच गहिरे
भग्न मनोरथ उधळीत सारे
आकांक्षांचे हिरेच गहिरे
जसे विखुरले नभात तारे
जसे विखुरले नभात तारे
विस्कटला रात्रीचा सालस सुनासुना संसार
कुठला मधु झंकार आ आ आ कुठला मधु झंकार
नवजीवनसंगीत हरपले
नवजीवनसंगीत हरपले
दोघांचे काळीज करपले
सोनेरी सुखस्वप्न भंगले
सोनेरी सुखस्वप्न भंगले
कोंदटला मनीं भीषण भयकर कोलाहल अंधार
कुठला मधु झंकार