Rachilya Kuni Ya Premkatha

रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा

नभि दिवसाचा देव उगवला
नभि दिवसाचा देव उगवला
धरणीवरी का नवा तजेला
धरणीवरी का नवा तजेला
दंव डोळ्यांतिल पार पळाले
दंव डोळ्यांतिल पार पळाले त्यागि तिज पाहता
रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा

ही चाफ्याची कळी गोरटी
ही चाफ्याची कळी गोरटी
अति लाजवट खुळी पोर ती
अति लाजवट खुळी पोर ती
कशि उमलली गीत लाडके
कशि उमलली गीत लाडके वाऱ्याचे ऐकता
रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा

नवपर्णांनी पूर्ण लहरला
नवपर्णांनी पूर्ण लहरला
वृक्षराज हा गगना भिडला
तशी तयाला दे आलिंगन
तशी तयाला दे आलिंगन कोमल पुष्पलता
रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा
रचिल्या कुणि या प्रेमकथा

Beliebteste Lieder von सुमन कल्याणपुर

Andere Künstler von Traditional music