Sakshis Chandra Ani Haluwar Sparsh Hote

Neel, Shank, G Ashok Paranjape

साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते
साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते
त्या भोगल्या क्षणांना त्या भोगल्या क्षणांना
नव्हतेच काहि नाते
साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते

डोळ्यांत बिंब होते नुसते भिजून गेले
डोळ्यांत बिंब होते नुसते भिजून गेले
नि:श्वास ते कळ्यांचे कोषांत लाजलेले
होता फुलून आला अंगावरी शहारा
गात्रांत मात्र राजा कसलेच भान नव्हते!
साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते

प्रतिसाद मूक होता ओठांत थांबलेला
प्रतिसाद मूक होता ओठांत थांबलेला
तो शब्द रे सुखाचा हृदयात कोंदलेला
गालावरी खुळी रे कळ एक साचलेली
दु:खात की सुखी रे काहीच ज्ञात नव्हते
साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते

Wissenswertes über das Lied Sakshis Chandra Ani Haluwar Sparsh Hote von सुमन कल्याणपुर

Wer hat das Lied “Sakshis Chandra Ani Haluwar Sparsh Hote” von सुमन कल्याणपुर komponiert?
Das Lied “Sakshis Chandra Ani Haluwar Sparsh Hote” von सुमन कल्याणपुर wurde von Neel, Shank, G Ashok Paranjape komponiert.

Beliebteste Lieder von सुमन कल्याणपुर

Andere Künstler von Traditional music