Sansar Mandiri Ya
Jagdish Khebudkar, Provakar Jog
संसार मंदिरी या आता उणे न काही
आनंद नाचतो ग आनंद गीत गाई
आता उणे न काही संसार मंदिरी या
झाले सुवासिनी मी हातात राज्य आले
गृहिणीपदावरी मी सार्या सुखात न्हाले
ही ठेव वैभवाची नांदे दिशांत दाही
आनंद नाचतो ग आनंद गीत गाई
आता उणे न काही संसार मंदिरी या
या श्याम मंजिरीचा वृंदावनी पिसारा
दारात कर्दळीला झुलवी सुगंध वारा
या श्याम मंजिरीचा वृंदावनी पिसारा
दारात कर्दळीला झुलवी सुगंध वारा
हे झाड अंगणी या रखवालदार राही
आनंद नाचतो ग आनंद गीत गाई
आता उणे न काही संसार मंदिरी या
पतिरूप देव माझा सिंहासनी विराजे
गालात हासते मी डोळ्यांत प्रीत लाजे
भाग्यास आज माझ्या उपमा सुचे न काही
आनंद नाचतो ग आनंद गीत गाई
आता उणे न काही संसार मंदिरी या