Thambali Bahinai Dari
Govind Powle, Shantabai Joshi
देऊळातल्या देवा या हो उतरा ही पायरी
थांबली बहिणाई दारी
थांबली बहिणाई दारी
अंगणी देवा प्रकाश उजळे
अंगणी देवा प्रकाश उजळे
येथे कीर्तन गायन चाले
येथे कीर्तन गायन चाले
रूप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी
देवा बहिणाई दारी
थांबली बहिणाई दारी
बघ येती ह्या संतविभूती समचरणावरी ठेउनी भक्ती
बघ येती ह्या संतविभूती समचरणावरी ठेउनी भक्ती
हरिनामाची होत आरती पाही सोहळा बाहेरी
देवा बहिणाई दारी
थांबली बहिणाई दारी
मी तर आले स्वये न्यावया
मी तर आले स्वये न्यावया
भक्तांची ही वेडी माया
भक्तांची ही वेडी माया
स्वये निघावे दर्शन द्याया टाळचिपळ्या झंकारती
देवा बहिणाई दारी
थांबली बहिणाई दारी
देऊळातल्या देवा या हो उतरा ही पायरी
थांबली बहिणाई दारी
थांबली बहिणाई दारी