Aaj Nadawala

Spruha Joshi

गीत आज मोहरते नवे
साद या स्वरातून दे सखे
मन तालामधे रंगले
का गुलाबी चढते नशा सांग ना
आज नादावला जीव हा
आज नादावला जीव हा
गीत आज मोहरते नवे
साद या स्वरातून दे सखे
मन तालामधे रंगले
का गुलाबी चढते नशा सांग ना?
आज नादावला जीव हा
आज नादावला जीव हा

पा पा
म ध प म ग रे ग ध प म प रे ग रे प रे ग रे ध नि

रंग नवा-नवा उमलते पाकळी
सांज हसे गाली मोहरे सावळी
तुझ्या आठवांचा मेघ झुरे
गंध केवड्याचा मागे उरे
तुझ्या आठवांचा मेघ झुरे
गंध केवड्याचा मागे उरे
मन तालामधे रंगले
का गुलाबी चढते नशा सांग ना
आज नादावला जीव हा
आज नादावला जीव हा

प प सा रे सा
प रे ग रे प रे ग रे सा नि ध
म ध प म ग रे ग ध प म प रे ग रे प रे ग रे ध नि
म ध प म ग रे ग ध प म
प रे ग रे प रे ग रे ध
रे ग रे प रे ग रे ध प प प प

रात जरा-जरा उतरली अंगणी
हो, जीव होई खुळा मिलनाच्या क्षणी
कळी गुलाबाची गाली खुले
मंद चांदण्यात घेई झुले
कळी गुलाबाची गाली खुले
मंद चांदण्यात घेई झुले
मन तालामधे रंगले
का गुलाबी चढते नशा सांग ना
आज नादावला जीव हा
आज नादावला जीव हा

प प ग रे ग सा

गीत आज मोहरते नवे
साद या स्वरातून दे सखे
मन तालामधे रंगले
का गुलाबी चढते नशा सांग ना
आज नादावला जीव हा
आज नादावला जीव हा
आज नादावला जीव हा

ग रे सा ग म ग ग सा रे सा ग म प प प

Wissenswertes über das Lied Aaj Nadawala von स्वप्निल बांदोडकर

Wer hat das Lied “Aaj Nadawala” von स्वप्निल बांदोडकर komponiert?
Das Lied “Aaj Nadawala” von स्वप्निल बांदोडकर wurde von Spruha Joshi komponiert.

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music