Aas Tu

आस तू भास तू ताल तू
खुलल्या श्वासांचा
रात तू प्रीत तू
अर्थ तू मिटल्या ओठांचा
पडसाद ओठी श्वासांचे
श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे
हे अर्थ स्वप्नांचे
आस तू भास तू ताल तू
खुलल्या श्वासांचा
रात तू प्रीत तू
अर्थ तू मिटल्या ओठांचा
पडसाद ओठी श्वासांचे
श्वासात मौनाचे
मौनात खुलती आज नवे
हे अर्थ स्पर्शाचे

अंतरी बेभान चांदण्याची रात का
सांगते भिजलेल्या पापण्यांचे गुज का
काहूर उठते मनी का
रंग गालास का हो
चिंब अंगावरी का शहारा
जीव होई जणू काजवा
पडसाद स्पर्शत मौनाचे
मौनात श्वासांचे
श्वासात रुजती अर्थ नवे अलवार ओठांचे
आस तू आस तू भास तू भास तू ताल तू ताल तू
खुलल्या श्वासांचा
रात तू रात तू प्रीत तू प्रीत तू
अर्थ तू मिटल्या ओठांचा
हा हा हा हा
हो लारू लारू ला इ ये

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music