I Love You

वेळावल्या सुरांनी
आभाळ चांदणे
हातात थरथरावी
लाजून कांकणे
चाहुल येता अंतरातून
काही उधाळते
असे रान ओले साद वेळी घालते

आज बेहोश बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला सांगते
आय लव्ह यू
आय लव्ह यू
आय लव्ह यू
आय लव्ह यू

चांद हा झाला जणू खुळा
डोहात आपले प्रतिबिंब
आज पाहुनी
चांद हा झाला जणू खुळा
डोहात आपले प्रतिबिंब
आज पाहुनी

अलवार ही मिठी
उमलून पाकळी
छंदात या रंगात या जा
रंगुनी

आज बेहोश बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला सांगते
आय लव्ह यू
आय लव्ह यू

मोकळ्या केसात या तुझ्या
हरवून जाऊ दे
गंधाळल्या अशा क्षणी
मोकळ्या केसात या तुझ्या
हरवून जाऊ दे गंधाळल्या
अशा क्षणी

वाटेत बावरा निशिगंध कोवळा
श्वासातूनी
स्पर्शातूनी तू साजणी

आज बेहोश बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला
सांगते

वेळावल्या सुरांनी
आभाळ चांदणे
हातात थरथरावी
लाजून कांकणे
चाहुल येता अंतरातून
काही उफाणते
असे रान ओले साद वेळी
घालते

आज बेहोश, बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला सांगते
आय लव्ह यू
आय लव्ह यू
आय लव्ह यू

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music