Ka Kadhi Kunache

Chandrashekhar Sanekar

का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही
का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही
यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही
का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही

वाटते शब्दातुनी त्याच्या न मी लक्षात आता
वाटते शब्दातुनी त्याच्या न मी लक्षात आता
पण तुला विसरून गेलो तो असेही म्हणत नाही
यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही
का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही

जाणतो मी खूप आहे प्रेम माझ्यावर तुझे पण
जाणतो मी खूप आहे प्रेम माझ्यावर तुझे पण
काळजाचा माझिया ठोका कधी का चुकत नाही
यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही
का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही

भ्रष्ट केला माणसाने अंतरीचा आरसाही
भ्रष्ट केला माणसाने अंतरीचा आरसाही
देव पहिल्यासारखा आता कुणाला दिसत नाही
यार पहिल्यासारखा का भेटल्यावर हसत नाही
का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही
का कधी येथे कुणाचेही कुणाशी जमत नाही

Wissenswertes über das Lied Ka Kadhi Kunache von स्वप्निल बांदोडकर

Wer hat das Lied “Ka Kadhi Kunache” von स्वप्निल बांदोडकर komponiert?
Das Lied “Ka Kadhi Kunache” von स्वप्निल बांदोडकर wurde von Chandrashekhar Sanekar komponiert.

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music