श्री स्वामी समर्थांची आरती

NANDU HONAP, RAMESH ANNAVKAR

जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था
जय श्रीस्वामीसमर्था
आरती ओवाळूं आरती ओवाळूं
चरणी ठेवुनियां माथा

छेली खेडेग्रामीं तूं अवतरलासी तूं अवतरलासी
जगदुद्धारासाठीं जगदुद्धारासाठीं राया तू फिरसी
भक्तवत्सल खरा तूं एक होसी तूं एक होसी
म्हणुनि शरण आलों म्हणुनि शरण आलों तुझे चरणासी
जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था
जय श्रीस्वामीसमर्था
आरती ओवाळूं आरती ओवाळूं
चरणी ठेवुनियां माथा

ञैगुणपरब्रह्म तूझा अवतार तूझा अवतार
त्याची काय वर्णूं त्याची काय वर्णूं लीला पामर
शेषादिक शिणले
नलगे त्या पार नलगे त्या पार
तेथें जडमूढ कैसा तेथें जडमूढ कैसा करुं मी विस्तार
जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था
जय श्रीस्वामीसमर्था
आरती ओवाळूं आरती ओवाळूं
चरणी ठेवुनियां माथा

देवादीदेव तूं स्वामीराया तूं स्वामीराया
निर्जर मुनिजन ध्याती निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां
तुजसी अर्पण केली आपुली ही काया आपुली ही काया
शरणागता तारीं शरणागता तारीं तूं स्वामीराया
जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था
जय श्रीस्वामीसमर्था
आरती ओवाळूं आरती ओवाळूं
चरणी ठेवुनियां माथा

अघटित लीला करूनीं जडमूढ उद्धरिले जडमूढ उद्धरिले
कीर्ती ऐकुनि कानी कीर्ती ऐकुनि कानी चरणीं मी लोळें
चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें मज हें अनुभवलें
तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरणा वेगळें
जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था
जय श्रीस्वामीसमर्था
आरती ओवाळूं आरती ओवाळूं
चरणी ठेवुनियां माथा
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

Wissenswertes über das Lied श्री स्वामी समर्थांची आरती von स्वप्निल बांदोडकर

Wer hat das Lied “श्री स्वामी समर्थांची आरती” von स्वप्निल बांदोडकर komponiert?
Das Lied “श्री स्वामी समर्थांची आरती” von स्वप्निल बांदोडकर wurde von NANDU HONAP, RAMESH ANNAVKAR komponiert.

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music