Vatevari Mogara

Shripad Arun Joshi

काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता

काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा

हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
गूज आपुले मनास सांगता
होई ऋतू लाजरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा

पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
हो पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता

धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता

उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा

काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा
त्यात वाटेवरी मोगरा
वाटेवरी मोगरा
त्यात वाटेवरी मोगरा (त्यात वाटेवरी मोगरा)
वाटेवरी मोगरा (वाटेवरी मोगरा)

Wissenswertes über das Lied Vatevari Mogara von स्वप्निल बांदोडकर

Wer hat das Lied “Vatevari Mogara” von स्वप्निल बांदोडकर komponiert?
Das Lied “Vatevari Mogara” von स्वप्निल बांदोडकर wurde von Shripad Arun Joshi komponiert.

Beliebteste Lieder von स्वप्निल बांदोडकर

Andere Künstler von Traditional music